Notification texts go here Contact Us Buy Now!

संत एकनाथ महाराज

 


संत एकनाथ

नाव :- संत एकनाथ
जन्म :- ई.स.1533
जन्मस्थान :- पैठण जिल्हा.संभाजीनगर
मृत्यु :- 26 फेब्रुवारी ई.स.1599
वडीलाचे नाव :- सूर्यनारायण
आईचे नाव :- रुक्मिणी
पत्नीचे नाव :- गिरीज्याबाई

जन्म - इ. स. १५३३ पैठण समाधी इ. स. १५९९ महाराष्ट्राच्या संत महात्म्यांतील महान भगवतभक्त एकनाथांचा जन्म सन १५२० मध्ये पैठण येथे झाला. त्यांच्या जन्माच्या आधी सुमारे ४० वर्षांपूर्वी बहामनी राज्याची पाच छकले उडून महाराष्ट्रात वेगवेगळ्या राजसत्ता सुरू झाल्या. त्या सर्व मुसलमानी शाह्या असल्या तरी त्या सत्तांमधून इथल्या मराठ्यांच्या नैसर्गिक गुणांना आणि कर्तृत्वाला अधिकाधिक वाव आणि मान्यता मिळण्यास याच काळात प्रारंभ झाला. या बदलत्या अनुकुल परिस्थितीचे सादपडसाद धर्म, भाषा, साहित्य इत्यादी क्षेत्रांत उमटू लागून महाराष्ट्रात लोकजागृतीची दुसरी प्रभावी लाट पुन्हा उसळली. एकनाथ हे या सांस्कृतिक पुनरुज्जीवन काळाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी होते.

पैठणला सर्वकाळ वास्तव्य असल्यामुळे पांडित्य, संस्कृत विद्यांबद्दल आत्मीयता व वारकरी संप्रदाय यांमुळे प्रेमळता, सौजन्य आणि शांती हा तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. कर्मठपणा आणि कर्मसन्यास शब्दपांडित्य आणि आत्मानुभव, व्यक्तिविचार आणि समाजधारणा यांच्यातील द्वैत नाहीसे करण्यात एकनाथ यशस्वी ठरले. नाथांच्या भागवताने काशीच्या पंडितानी माना डोलावल्या तर त्यांच्या भारुडांना बहुजन समाजाने डोक्यावर घेतले. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामयण, या पांडित्यपूर्ण रचनेत आध्यात्मिक नवरस खेळवून मराठी साहित्याला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळवून दिली बहुजन समाजासाठीभारुडातून आध्यात्मिक व प्रापंचिक देववाद दाखवून दिला. 

إرسال تعليق

भक्तीसाधना
Label/थोर व्यक्ती
Cookie Consent
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.