Notification texts go here Contact Us Buy Now!

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक यांची माहिती बाळ गंगाधर टिळक कोण होते लोकमान्य टिळक यांची माहिती भाषण लोकमान्य टिळक यांचा जन्म कोठे झाला लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य

 


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

  • पुर्ण नाव :- बाळ(केशव) गंगाधर टिळक
  • जन्म :- 23 जुलै 1856 
  • जन्मस्थान :- चिखलगाव तालुका.दापोली जिल्हा. रत्नागिरी  मृत्यु :- 1 आँगस्ट 1920 
  • मृत्यू ठिकाण :- मुंबई 
  • वडीलाचे नाव :- गंगाधरपंत टिळक
  • आईचे नाव :- पार्वतीबाई गंगाधरपंत टिळक
  • पत्नीचे नाव :-  सत्यभामाबाई (तापीबाई हे होते लग्नानंतर त्याचे नाव बदलून सत्यभामाबाई ठेवण्यात आले)
         


    भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं त्यांमध्ये लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. कारण या थोर महात्म्यांनी तरुण वयातच समाज सुधारण्यासाठी व समाज ऐक्यासाठी जिद्दीने पाउले उचलली. देशभक्तीच्या आलोट प्रेमापोटी स्वदेशाचा नारा देशभर पसरवला.

     समाज जागृतीसाठी लेखणी आवश्यक आसल्याचे चाणाक्षपणे 'ओळखून 'केसरी' व 'मराठा' यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली. जहालमतवाद्यांचे लो. टिळक नेते बनले. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक आहे, आणि तो मी मिळविणारच' अशा प्रयत्नवादाचा जनक लो. टिळक बनले. समाज तर सुधारलाच पाहिजे, प्रथम स्वातंत्र्य आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.
     शिक्षणाची माणसाच्या आयुष्यात अतिशय निकडीची गरज आहे. ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. मोडेन पण वाकणार नाही अशी त्यांची स्वराज्यासाठी मनापासून तयारी होती. समाज जागृती व हिंदुमुस्लीम ऐक्य यासाठी अनेकप्रकारचे ध्येयवादी प्रयोग केले. परकीय सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाची अनेक वेळा ओळख करून दिली. टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी आयुष्यभर लढले. आजही आपण त्यांचे नाव अभिमानाने घेतो.


Post a Comment

भक्तीसाधना
Label/थोर व्यक्ती
Cookie Consent
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.